ठाणे, दि. २१ - एकीकडे देशातील खूप मोठ्या संख्येने असलेल्या जनतेला पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा होत नसतानाच, गेल्या दशकभरात तब्बल ७.४२ टन अन्नधान्याची नासाडी झाल्याचे दिसून आले आहे. या अन्नधान्याची किंमत ३३० कोटी ७१ लाख रुपये होते. एकीकडे देशातील सर्व जनतेला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध व्हावे, यासाठी अन्नसुरक्षा विधेयक मांडण्याची सरकारची जोरदार तयारी सुरू असतानाच, नासाडी झालेल्या अन्नधान्याचा चिंताजनक आकडा समोर आला आहे.

ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते ओम प्रकाश शर्मा यांनी माहितीच्या अधिकाराखाली दाखल केलेल्या अर्जाला उत्तर म्हणून भारतीय अन्न महामंडळाने ही माहिती उघड केली आहे.
ही आकडेवारी एप्रिल २००० ते मार्च २०११ या काळासाठीची आहे. यात २०००-०१मध्ये सर्वाधिक अन्नधान्य वाया गेले आहे. या काळात १ लाख ८२ हजार टन अन्नधान्य वाया गेले आहे. त्याची किंमत ६७.५२ कोटी रुपये होते.