मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) - मराठी कवितेच्या प्रांतातील संध्यामग्न पुरूष कवी ग्रेस यांना त्यांच्या ‘वार्याने हलते रान ’या ललितबंधासाठी आज साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.

ग्रेस यांच्या सोबत कोंकणी कवी प्राक्रितिचो पास, हिंदी कादंबरीकार रेहन राघू,उर्दू कवी खलिल मामूल, इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनाही हा सन्मान घोषित झाला आहे. ग्रेस यांना ललितबंधासाठी हा पुरस्कार मिळाला असला तरी, २0११च्या अकादमी पुरस्कारांवर कवितेचेच राज्य आहे. आठ कवितासंग्रह, सात कादंबर्या, तीन निबंधसंग्रह आणि लघुकथा, इतिहास, चरित्र आणि नाटक या साहित्यप्रकारातील प्रत्येकी एक साहित्यकृती असे एकूण २२ अकादमी पुरस्कार यंदा जाहीर झाले आहेत.
‘वार्याने हलते रान’ हे कवी ग्रेस यांचे तसे अगदी अलीकडचे पुस्तक.
या सार्या पुस्तकांची दखल साहित्य अकादमीला कधी घ्यावी वाटली नाही. प्रत्यक्षात या पुस्तकांचे आणि ग्रेसच्या कवितांचे प्रचंड गारूड प्रत्येक पिढीवर स्वार होत आले आहे. उशिरा का होईना पण, अकादमीचा सांगावा आला याचा कवी ग्रेस यांना त्यांच्या चाहत्यांइतकाच आनंद झाला आणि तो त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
ग्रेस म्हणाले, २0 वर्षांत कितीदा हुलकावणी दिली हो ! विद्वेषाच्या या परिक्षेत ज्या परीक्षकाला माझे पुस्तक सुचवावेसे वाटले त्याचे खरेच पाय धरावेसे वाटतात. आणि खरं सांगू ? आता असे वाटते की, आजवर भोगलेल्या सार्वजनिक विद्वेषाचे अमृतात रुपांतर झाले आहे.
---------
ग्रेस = परमेश्वरी कृपा
माणिक गोडघाटे हे कवी ग्रेस म्हणून साहित्यविश्वात प्रसिद्ध आहेत. परमेश्वरी कृपा या अर्थाने त्यांनी हे साहित्यिक नाव धारण केले आहे. ते स्वत:ला ईश्वराचा कवी देखील म्हणतात. ’संध्याकाळच्या कविता’ या १९६७ साली प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहामुळे ते चर्चेत आले. अगदी अर्पण पत्निकेपासून ते स्वत:च्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी देण्याची पद्धत अशा खास गोष्टी त्यांनी त्या पुस्तकाद्वारे आणल्या आणि ती परंपरा पुढेही चालू ठेवली. अनेक समीक्षकांनी त्यांची कविता दुबरेध ठरविली तरी समीक्षकांचे दुबरेधपण ग्रेसांनी कधी जुमानले नाही. उन्हीसे क्या डरना भई..हमारी वजहसे तो उनकी, सल्तनत है.. असे त्यांनी औरंगाबादेत एका बी. रघुनाथ काव्यसंध्येत सुनावले होते. पाच काव्यसंग्रह आणि तितकेच ललितलेखसंग्रह ही साहित्यिक ग्रेस यांची (सर्वांना सहजपणे कळू शकणारी) कामगिरी आहे.
ग्रेस हे र्मढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्या पिढीतील एक अग्रगण्य कवी. तथापि त्यांच्या कवितेतील नवाई आणि आत्मपरता भावात्म नादलयींच्या अंगाने बहरत गेली. मृत्यू आणि एकटेपण ह्यांचे एक उदास भान आणि त्यांतून निर्माण होणारी करुणा हे त्यांच्या कवितेच्या मूलाशयाचे महत्त्वपूर्ण घटक होत. त्यांच्या भावकाव्यात्म निबंधांतून ग्रेस यांच्या कवितांतील अनेक व्यक्तिगत संदर्भ आणि जागा मोकळ्या झाल्यासारख्या वाटतात. या निबंधांचे आणि त्यांच्या कवितांचे दुवे एकमेकांत मिसळून गेलेले आहेत.
बाईला समजून घेणे हा माझ्यामधील पुरूषाचा पुरुषार्थ आहे, असे त्यांनी कित्येकदा जाहीरपणे सांगितले आहे. परमेश्वराने विश्व निर्माण करताना चुका केल्या आहेत, त्या सुधारणे हा माझ्यासारख्या कलावंताचा धर्म आहे, असेही त्यांचे सांगणे आहे. मी माझ्या कवितेचा प्रियकर किंवा पाठीराखा नाही असे म्हणणार्या कवी ग्रेस यांनी पंडित ह्रदयनाथ मंगेशकरांसोबत द्विदल कार्यक्रमांची मालिका नुकतीच पूर्ण केली.
---------
ग्रेसफुल साहित्यसंपदा
संध्याकाळच्या कविता - कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशन १९६७
राजपुत्न आणि डार्लिंग - कवितासंग्रह अमेय प्रकाशन,पॉप्युलर प्रकाशन १९७४
चर्चबेल - ललित बंध पॉप्युलर प्रकाशन १९७४
चंद्रमाधवीचे प्रदेश - कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशन १९७७
मितवा - ललित लेखसंग्रह पॉप्युलर प्रकाशन १९८७
सांध्यपर्वातील वैष्णवी - कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशन १९९५
संध्यामग्न पुरुषाची लक्षणे - ललित बंध पॉप्युलर प्रकाशन २000
मृगजळाचे बांधकाम - ललित बंध पॉप्युलर प्रकाशन २00३
सांजभयाच्या साजणी - कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशन २00६
वार्याने हलते रान - ललित बंध पॉप्युलर प्रकाशन २00८
कावळे उडाले स्वामी - ललित बंध पॉप्युलर प्रकाशन २0१0