More Sensational News

Thursday, 29 September 2011

'मुंबई विका आणि महापालिका बंद करा'



Admagnet-X
'मुंबई विका आणि महापालिका बंद करा'
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 29, 2011 AT 12:48 PM (IST)
Tags: mumbai,   municipal corporation,   high court,   maharashtra
मुंबई - मुंबई शहर विकायला काढले आहे, अशी शहरातील वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्या आणि मुंबई महानगरपालिकेचे दार बंद करून घरी बसा, अशी जळजळीत टीका आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेवर केली.

शहरातील रस्त्यांवर चौकाचौकात वाहतूक पोलिसांसाठी एका खासगी कंपनीने बूथ उभे करून दिले होते. सुरवातीला महापालिकेने हे बूथ उभे करण्यास त्या कंपनीला परवानगी दिली होती आणि नंतर ती परवानगी काढून घेतली. त्यामुळे या कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आज सुनावणी होत उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेवर जोरदार टीका केली आहे.

महापालिकेने नवरात्रीचा मुहुर्त साधून नीट वागण्याची शपथ घ्यावी. त्यामुळे रावणाचा वध होण्याची वेळ येऊ नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे.