More Sensational News

Thursday, 29 September 2011

प्रणव मुखर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट


नवी दिल्ली - टू जी स्पेक्ट्रम गैरव्यवहार प्रकरणी अर्थ मंत्रालयाने लिहिलेल्या पत्रामुळे सुरु असलेल्या वादाप्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज (गुरुवार) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

स्पेक्ट्रम वाटपाच्या गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी बुधवारी केलेल्या स्पष्टीकरणानंतर आज मुखर्जी यांनी सोनिया गांधींची भेट घेऊन चर्चा केली. मुखर्जी यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी सोनिया गांधी यांनी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी, राजकीय सचिव अहमद पटेल यांची भेट घेतली होती. गेल्या तीन दिवसांत मुखर्जी आणि सोनिया गांधींमध्ये झालेली ही तिसरी भेट आहे. या आठवड्यात सुरवातीलाच केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आणि पंतप्रधानांनी काल सोनिया गांधीची भेट घेतली होती.

स्पेक्ट्रम २००१ मध्ये ज्यावेळी वाटप करण्यात आले होते, त्यावेळी अर्थमंत्री चिदंबरम असल्याचे पत्र अर्थ मंत्रालयाने पंतप्रधानांना पाठविल्याने खळबळ उडाली होती. या पत्रावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.