More Sensational News

Thursday, 29 September 2011

आईला नव्या घरात आणल्याचे समाधान : सचिन


आईला नव्या घरात आणल्याचे समाधान

सचिनचा कुटुंबासमवेत गृहप्रवेश



मुंबई। दि. 28 (प्रतिनिधी)

मुंबई शहरात स्वत:चे का होईना एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही याला अपवाद ठरला नाही.

घटस्थापनेचे औचित्य साधत वांद्रे पश्किमेकडील आपल्या नव्या ड्रीम होममध्ये कुटुंबासमवेत

गृहप्रवेश केल्यानंतर गहिवरलेल्या सचिनने आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आईला नव्या घरात आणल्याचे समाधान व्यक्त केले.

सचिनने वांद्रे पश्चिमेकडील एका पारशी इसमाकडून बंगला विकत घेतल्यानंतरच त्याच्या नव्या घराच्या चर्चेला उधाण आले होते. नव्या घराचे नूतनीकरण, घराचे माळे, सचिनसमवेत कोण राहणार? आणि त्याच्या नव्या घराचे इंटीरियर डिझाइनर्पयत सर्वच बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. साध्या वेशात वावरणारा सचिन टी-शर्ट आणि ट्राउझर्समध्ये गृहप्रवेशासाठी वांद्रे येथे दाखल झाला.



‘मी माङया कुटुंबाला, विशेषत: आईला नव्या घरात आणू शकलो याचे मला समाधान आहे.’ - सचिन तेंडुलकर



सचिनचे नवे घर पाच माळ्यांचे आहे. खालील दोन मजले केवळ पार्किगसाठी ठेवण्यात आले असून, एकावेळी येथे पन्नासपेक्षा अधिक वाहने उभी राहू शकतील.

मागील दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा:या सचिनला गौरवण्यात आल्यानंतर मिळालेली पदके, चषक ठेवण्यासाठी सुद्धा स्वतंत्र एक मजला ठेवण्यात आला आहे.



आई रजनी तेंडुलकर, पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी व मुलगा सारा, अजरुन यांना सोबत घेऊनच गृहप्रवेश केल्यानंतर सचिनला भावना अनावर झाल्या.



वांद्रे येथे मास्टर

ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कुटुंबासमवेत गृहप्रवेश केल्यानंतर पत्रकारांसोबत संवाद साधला.