अफजल प्रकरणावरून कामकाज ठप्प | ||
संसद हल्ल्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेला दहशतवादी अफझल गुरू याला क्षमादान देण्यासंबंधीच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांनी अभूतपूर्व गोंधळ घातल्याने आज जम्मू-काश्मीर विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. अध्यक्ष मोहम्मद अकबर लोन यांनी सभागृहाचे कामकाज ठप्प पडल्याने हा प्रस्ताव आपोआप मोडीत निघाल्याचे सांगितले. अपक्ष आमदार शेख अब्दुल राशीद यांनी दिलेल्या गैरसरकारी प्रस्तावाची मुदत आता संपली असून, तो नऊ दिवसीय चालू विधानसभा अधिवेशनात येऊ शकणार नाही. हे अधिवेशन मंगळवारी संस्थगित होणार आहे. सभागृहात सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भाजपा सदस्य शाब्दिक खडाजंगीसोबतच हाणामारीवर आले व पंखे आणि टेबल पाडले. |
More Sensational News
Thursday, 29 September 2011
अफजल प्रकरणावरून कामकाज ठप्प
Labels:
Breaking News,
HeadlinesToday,
लोकमत न्यूज