More Sensational News

Saturday, 24 March 2012

चोरांनी देव लुटला!

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यांतील दिवेआगरच्या प्रसिध्द सुवर्णगणेश मंदिरात शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी हैदोस घालून २४ कॅरेट सोन्याची १ किलो ३00 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि सुमारे ३00 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गणेश भक्तांच्या o्रध्देवरच दरोडा आल्याची भावना असून परिसरात दहशत आहे.
रात्री दरोडेखोरांनी सुवर्णगणेश मंदिराच्य मागच्या बाजूचे छपराची कौले काढून मंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक महादेव घडशी (५५) आणि अनंत भगत (५0 ) या दोघांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते दोघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला डावा साधला. यातील गंभीर जखमी महादेव घडशी यांचा आज दुपारी मृत्यू झाला तर अनंत भगत गंभीर आहेत.
शनिवारी सकाळी ६.३0 वाजता मंदिराचे पुजारी दिलीप तथा बाळू अभ्यंकर नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता त्यांना रखवालदार बेशुद्ध पडलेले दिसले. तसेच मंदिराच्या छपराची कवैलू काढलेले दिसले. अभ्यंकर यांनी लगेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली.
ट्रस्टचे पदाधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने .....परिसरातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिर परिसरात जमू लागल्या. श्रद्धास्थानावरच दरोडा पडल्याने लोक संतप्त होते. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांमध्येही दहशत होती. थोड्याचवेळात घटनास्थळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाड विभागाचे उपविभागीय अधिकारी रविंद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी खरात, पोलीस निरीक्षक शुक्ला, प्रकाश बिराजदार, रासकर इ. अधिकारी तसेच ठसे तज्ञ, श्‍वान पथक येवून दाखल झाले. मंदिरात नाईट व्हीजन सी. सी. टी. व्ही. कॅमेरेही कार्यरत असल्यामुळे या दरोड्याचा तपास निश्‍चीत लागेल असा विश्‍वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

तिन्ही बाजूने समुद्रखाडीने नैसर्गिक विळखा घातलेल्या दिवेआगरमध्ये १७ नोव्हेंबर १९९७ ला द्रौपदी पाटील यांच्या सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. त्यात ही सव्वा फूट उंचीची सोन्याची गणपतीची मूर्ती आणि सोन्याचे दागिने सापडले होते.