More Sensational News

Sunday, 18 March 2012

नोकरी करु न दिल्याने सुनेने केली सासूची हत्या


पुणे: कोथरुड परिसरातल्या मयूर कॉलनीमध्ये एका वृद्धेची निर्घृण हत्या झाल्याचं उघडकीस आलं आणि पुण्यात खळबळ उडाली. आता या हत्येप्रकरणी तेवढाच खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या वृद्धेच्या सुनेनंच अतिशय नियोजनबद्धरित्या सासूची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
शोभा सेलारका या ६२ वर्षीय महिला मयूर कॉलनीमध्ये राहत होत्या. श्वेता या त्यांच्या सुनेनं सोमवारी संध्याकाळी त्यांची हत्या केली आणि ही हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात श्वेताचं हे कारस्थान उघड झालं.
विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या श्वेताला नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र सासू शोभा सेलारका यांना ही गोष्ट मान्य नव्हती. यावरुन त्यांचे नेहमी खटके उडायचे. त्याचाच राग मनात धरुन श्वेतानं ही हत्या केली.
मेकअप करण्याच्या बहाण्यानं सासूला आधी खुर्चीत बसवलं आणि घरातल्या खलबत्यानं तिच्या डोक्यावर वार केलं. हा दरोड्याचा प्रकार वाटावा म्हणून घरातल्या सुरीनं सासूच्या गळ्यावर आणि छातीवर वारही केले. त्यानंतर श्वेतानं अंघोळ करुन मुलीला घरी आणलं आणि नवऱ्याला फोन करुन अज्ञात व्यक्तीनं सासूची हत्या केल्याचं सांगितलं.
हत्या केल्यानंतर घरातली कपाटं आणि इतर ठिकाणचं साहित्य अस्ताव्यस्त होतं. मात्र दागिने आणि पैसे घरातच असल्यानं पोलीसही बुचकळ्यात पडले होते.
पोलिसांनी थोडी कसून चौकशी केल्यानंतर श्वेताचा हा बनाव अखेरीस समोर आला.