More Sensational News

Friday, 30 December 2011

श्रीमंतांवर जास्त कर लावायला हवा - चिदंबरम

नवी दिल्ली - श्रीमंतांवर जास्त कर लावायला हवा, असे मत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले असून, आपले हे मत अनेकांना आवडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ""आपण करांद्वारे मिळणारे उत्पन्न वाढवायला हवे. ही कल्पना अनेकांना आवडणार नाही, पण त्यासाठी धैर्य आपण दाखवायला हवे. मी केंद्रीय अर्थमंत्री असताना कर कमी केले होते. त्यामुळे आता मीच हे मत मांडत असल्याने जास्त कर भरण्यास तयार राहा. विशेषतः श्रीमंतांनी जास्त कर भरण्यासाठी तयारी करावी.''

युरोपातील श्रीमंत लोक आमच्यावरील कर वाढवा, अशी मागणी करत असल्याचे उदाहरण त्यांनी दिले. ""मी हे सांगण्यासाठी अधिकारी व्यक्ती नाही; पण आपण या कल्पनेवर गांभीर्याने विचार करायला हवा,'' असे त्यांनी नमूद केले.