More Sensational News

Monday, 26 December 2011

अण्णा कि आवाज देश कि आवाज

देश को भ्रष्टाचार मुक्त बनाना, भ्रष्टाचार को जड से उखाडना ये आम जनता की आवाज है. अण्णा ये आवाज को उठा रहे है. जनता के लिये लढ रहे है. इसलीये हम अण्णा के नेतृत्वमे यहा अनषन के लीये आये है. अनशन खत्म होने के बाद हम खुद को पुलीस के हवाले कर देंगे और उसके आगे अण्णा जो आदेश देंगे वही हम करेंगे, हरियाणाच्या गोहाना जिल्हय़ातून दुपारीच एमएमआरडीए मैदानावर दाखल झालेले पंडित विजयकुमार पुलस्त्य भावना व्यक्त करत होते.
विजयकुमार यांच्याप्रमाणे हरियाणा, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधून हजारो किलोमिटरचे अंतर तुडवत अण्णांचे, भ्रष्टाचारविरोधी लढय़ाचे पाठिराखे एमएमआरडीए मैदानात दाखल होत आहेत. पाठिशी मोजक्या कपड्यांची बॅग, हाती तिरंगा, डोक्यावर मी अण्णाची टोपी, छातीवर अण्णांचा फोटो असलेले बॅज लावून मैदानात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, अण्णा हजारे झिंदाबाद, अण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे
साथ हैचे नारे देत सर्व माध्यमांचे लक्ष वेधून घेतले.
अण्णांच्या मनातले लोकपाल विधेयक पारित होत नाही तोपर्यंत अण्णा जिथे कुठे आंदोलन करतील तेथे आम्ही त्यांच्यासोबत असू, असा विश्‍वास पुलत्स्य आणि त्यांच्यासोबत अरियाणाहून आलेल्या सत्यनारायण पांचाळ, रविंद्र मेहरा यांनी व्यक्त केला. हे तिघेही अण्णांसोबत जंतरमंतर, रामलिला मैदानात उपोषणात सहभागी होते. भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनचे मुंबई अध्यक्ष भावेश पटेल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे हरियाणाप्रमाणे, उत्तरप्रदेश, बिहार, दिल्ली, कर्नाटक आणि अन्य राज्यांमधील आम जनता मुंबईत धडकली आहे. आम्ही नेहमीच भ्रष्टाचाराविरोधात आहोत. अण्णा तीच लढाई लढत आहेत. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा आहे, असे उलेमा काऊन्सीलचे मौलाना मेहमूद दर्याबंदी यांनी सांगितले.


-या मैदानाबाहेरील व्यवस्था पोलिसांकडे तर अंतर्गत व्यवस्थेची जबाबदारी टीम अण्णाकडे आहे. आंदोलनाच्या पूर्वसंध्येला या दोन्ही यंत्रणा आपापल्या जबाबदार्‍या चोख पार पाडण्यासाठी लगबगीत दिसत होत्या. विशेष शाखेचे बॅज आणि साध्या कपड्यातले असंख्य पोलीस मैदानात, मैदानाबाहेर सुरक्षाचा आढवा घेत होते. दुसरीकडे कार्यकर्ते स्टेज, व्हीआयपी प्रवेशद्वार, कलाकार-माध्यमांसाठीचे स्टेज, सीसीटीव्ही, वॉच टॉव्हर्स या व्यवस्थेत मग्न होते.

-मैदानाभोवती ५0 सीसीटीव्ही कॅमेरे, पोलीस आणि टीम अण्णाचे स्वतंत्र, सुसज्ज नियंत्रण कक्ष, वॉकीटॉकी, प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर अशी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.

मीडियावर करडी नजर
राजकीय किंवा सामाजिक नेत्यावर चप्पल भिरकावणे किंवा त्याला मारहाण करणे हा प्रकार उपोषणाला बसणार्‍या अण्णांसोबत होऊ नये यासाठी टीम अण्णाने विशेष दक्षता घेतली आहे. उंच स्टेज, स्टेजपासून आंदोलकांना ५0 फुट दूर ठेवण्याची व्यूहरचना आखण्यात आली आहे. मात्र या दरम्यान माध्यमांसाठी एक स्टेज उभारण्यात आले आहे. आतापर्यंतचे हल्ले माध्यमप्रतिनिधी बनून आलेल्यांनीच केल्याने स्टेजवर आणि वार्तांकनासाठी मैदानात भटकणार्‍या पत्रकारांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

मुंबईत दक्षतेचा इशारा
समाजसेवक अण्णा हजारे यांच्या एमएमआरडीएच्या मैदानावर होत असलेल्या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आली आहे. आंदोलनस्थळाचे परिसर व मार्गावर सुमारे अडीच हजार पोलिसांचा फौजफाटा तीन दिवस २४ तास तैनात करण्यात आला आहे. कायदा हातात घेणार्‍या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. लोकपाल विधेयकाबाबत आण्णा हजारे उद्यापासून तीन
दिवस एमएमआरडीएच्या मैदानावर उपोषण करणार आहेत. या आंदोलनामुळे कायदा व सूव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलीस सज्ज झाले आहेत. मैदानातील सुरक्षेची जबाबदारी एमएमआरडीएवर असली तरी साध्या वेषात पोलीस असणार आहेत.

जेलभरोसाठी पोलिसांची खबरदारी
अण्णा हजारेंच्या तीन दिवसांच्या उपोषणानंतर ३0 जानेवारीला देशभरात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होणार्‍यांची स्थानिक पोलीस ठाण्यात केवळ नाव नोंदणी घेवून त्यांना तात्पुरती अटक केली जाईल, हिंसक कृत्य झाल्यास त्यांच्यावर योग्य कारवाई केली जाईल.
- रजनीश सेठ, पोलीस सहआयुक्त