कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाचा युवा जलद गोलंदाज जेम्स पॅटिन्सन म्हणतो की, सचिनला गोलंदाजी करायला मी घाबरत नाही, कारण सचिन आता म्हातारा झालाय.
पॅटिन्सन म्हणतो, मला माहित आहे सचिनला गोलंदाजी करणे एक आव्हान आहे, पण सचिन एका योग्य वेळी माझ्या समोर आलाय, कारण सचिन आता म्हातारा झालाय.
ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाने हे वक्तव्य केल्याने प्रश्न हा ही उपस्थित राहतोय की, खरोखर सचिन म्हातारा झालाय. हे ही निश्चित आहे की, सचिन पॅटिन्सनच्या वक्तव्यावर काहीही बोलणार नाही.
पॅटिन्सन यांच्यासाठी क्रिकेटचा खेळ नवा आहे, पॅटिन्सन याचं जेवढं वय आहे तेवढे वर्ष सचिन क्रिकेट खेळलाय, म्हणूनच सचिन बद्दल तो असं बोलला असावा.
पॅटिन्सनला हे ही माहित नसावं की, ३८ वर्ष वय असलेला सचिन युवा खेळाडूंना मात देतो, एक वेळेस नाही तर पुन्हा-पुन्हा
जेव्हा सचिन तेंडुलकरचं वय ३६ वर्ष होतं तेव्हा सचिनने इतिहास रचला होता, ज्याविषयी कुणी विचारही करू शकत नाही. सचिनने ३६ व्या वर्षी वनडे क्रिकेटमध्ये पहिलं दुहेरी शतक झळकावलं होतं.
आता जेव्हा पॅटिंन्सला सचिनचे काही रेकॉर्ड सांगू या, २०११ साली कसोटी क्रिकेटमधील हे आकडे आहेत. साल २०११ मध्ये सचिनने ८ कसोटी सामन्यांमध्ये एक शतक आणि ४ अर्धशतक लगावत ६५१ धावा केल्या, ऍव्हरेज होता ४६.५.
सचिनचं ३८ व्या वर्षीही शानदार प्रदर्शन सुरू आहे, यावेळेस सचिन तेंडुलकर तरं ऑस्ट्रेलियातच खेळणार आहे. सचिनची पसंतीची विरोधी टीम ऑस्ट्रेलिया . या संघाविरोधात सचिन धावांचा डोंगर उभा करतो.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान बॉलर पॅटिन्सन
ऑस्ट्रेलियातील सचिनचा रेकॉर्ड
सचिनने ऑस्ट्रेलियात एकूण १६ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १५ हजार २२ धावा केल्या आहेत. या दरम्यान सहा षटकार आणि पाच अर्धशतक सचिनने लगावली आहेत.
ऑस्ट्रेलियाचा सचिनचा हा पाचवा दौरा असेल, टेस्ट करियरमध्ये सचिनने सर्वाधिक जास्त ११ शतकं ऑस्ट्रेलियाच्या विरोधात केली आहेत.
जर हे आकडे पाहिले तर जेम्स पॅटिन्सनने सचिनच्या वयावरून आपलं मत बदललं असतं. त्याने सचिनचे ते डावही पाहायला हवेत ज्यात सचिनने शेन वॉर्न आणि ग्लेन मॅग्राला धुतलंय. पेटिन्सनच्या बॉलिंगला उत्तर देऊन सचिन कधीही पॅटिन्सनचा दुराग्रह दूर करू शकतो.