मुंबई दि. १३ - बँका आणि आयातदारांकडून डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची किंमत घसरतच चालली आहे. रुपयाने आजपर्यंतचा नीचांक गाठला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ५३.२९ रुपये इतकी झाली आहे.
शेअर बाजारतील घसरण आणि डॉलरच्या वाढत्या मागणीमुळे मंगळवारी बाजार उघडताच रुपया ५३. २९ रुपये इतक्या पातळीवर घसरला. तसेच इतर चलनांच्या तुलनेत डॉलर वधारल्यामुळेही डॉलर व रुपयाच्या विनिमय दरावर परिणाम झाल्याचे दिसून आले.
दरम्यान मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकातही मंगळवारी सकाळी ६०.९८ अंकांची घसरण होऊन तो १५, ८०९ वर पोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा निर्देशांक १८ अंकांनी घसरून ४, ७४६ वर पोचला