अंधेरी - केंद्राने हिवाळी अधिवेशनात सशक्त जन लोकपाल विधेयक मंजूर न केल्यास येत्या ? 00 तारखेपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट करतानाच 2012 वर्षाची सुरुवात "जेल भरो' आंदोलनाने होईल, असे इशारा "इंडिया अगेन्स्ट करप्शन'च्या कोअर कमिटीचे मुंबई प्रमुख मयंक गांधी यांनी दिला. सशक्त जन लोकपाल विधेयक तत्काळ मंजूर केले नाही, तर संपूर्ण भारतात कॉंग्रेसविरोधी प्रचार करू. हिस्सारच्या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसून झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या मुंबई पालिकेच्या निवडणुकीत अण्णा समर्थक कॉंग्रेसविरोधी प्रचार करतील, असेही ते म्हणाले.
अंधेरी (पश्चिम) येथील श्रीराम वेल्फेअर विद्यालयात गुरुवारी (ता.15) सभा झाली. यात गांधी बोलत होते. या वेळी अण्णा टीममधील मनीष सिसोदिया सभेस उपस्थित होते.
लवकरच मुख्य समितीची बैठक आहे. त्यानंतर उपोषणाबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सिसोदिया यांनी यावेळी सांगितले. सशक्त लोकपाल विधेयक मंजूर न झाल्यास अण्णासमर्थक डिसेंबर महिन्यात धरणे, उपोषण तसेच जानेवारीत "जेल भरो' आंदोलन करतील.
वांद्रे-कुर्ला संकुलातील "एमएमआरडीए'चे मैदान उपोषणासाठी योग्य आहे. त्यामुळे या जागेची निवड करण्याची शक्यता आहे, असे गांधी म्हणाले. खासदार लोकपाल विधेयकाविरोधात मत व्यक्त करेल त्याच्या घरासमोर धरणे धरण्यात येईल व वेळ पडल्यास सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या घरासमोरही आंदोलन करू, असे त्यांनी स्पष्ट केले.