More Sensational News

Saturday, 24 September 2011

हिमालयात विमान कोसळून १८ प्रवासी ठार

काठमांडू, दि. २५ - हिमालयामध्ये प्रवासी विमान कोसळून १८ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला आहे. १६ विदेशी प्रवासी आणि ३ कर्मचा-यांचा समावेश असलेले बुद्धा एअरवेजचे १९ सीटर विमान माउंट एव्हरेस्टहून काठमांडूला परत येताना वाटेत कोसळले. या दुर्घटनेमध्ये १८ जण ठार झाले असून एक जण बचावला असल्याची माहिती आहे. हा अपघात काठमांडूपासून अवघ्या १० किलोमीटरवरील गोदावरी येथे घडला.