More Sensational News

Saturday, 24 March 2012

चोरांनी देव लुटला!

रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यांतील दिवेआगरच्या प्रसिध्द सुवर्णगणेश मंदिरात शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी हैदोस घालून २४ कॅरेट सोन्याची १ किलो ३00 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि सुमारे ३00 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना गणेश भक्तांच्या o्रध्देवरच दरोडा आल्याची भावना असून परिसरात दहशत आहे.
रात्री दरोडेखोरांनी सुवर्णगणेश मंदिराच्य मागच्या बाजूचे छपराची कौले काढून मंदिरात प्रवेश केला. यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक महादेव घडशी (५५) आणि अनंत भगत (५0 ) या दोघांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते दोघेही बेशुद्ध पडले. त्यानंतर दरोडेखोरांनी आपला डावा साधला. यातील गंभीर जखमी महादेव घडशी यांचा आज दुपारी मृत्यू झाला तर अनंत भगत गंभीर आहेत.
शनिवारी सकाळी ६.३0 वाजता मंदिराचे पुजारी दिलीप तथा बाळू अभ्यंकर नेहमीप्रमाणे मंदिरात गेले असता त्यांना रखवालदार बेशुद्ध पडलेले दिसले. तसेच मंदिराच्या छपराची कवैलू काढलेले दिसले. अभ्यंकर यांनी लगेच मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली.
ट्रस्टचे पदाधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. तसेच ही बातमी वार्‍यासारखी सर्वत्र पसरल्याने .....परिसरातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिर परिसरात जमू लागल्या. श्रद्धास्थानावरच दरोडा पडल्याने लोक संतप्त होते. मंदिर ट्रस्टच्या पदाधिकार्‍यांमध्येही दहशत होती. थोड्याचवेळात घटनास्थळी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, महाड विभागाचे उपविभागीय अधिकारी रविंद्र हजारे, उपविभागीय पोलीस अधिकारी खरात, पोलीस निरीक्षक शुक्ला, प्रकाश बिराजदार, रासकर इ. अधिकारी तसेच ठसे तज्ञ, श्‍वान पथक येवून दाखल झाले. मंदिरात नाईट व्हीजन सी. सी. टी. व्ही. कॅमेरेही कार्यरत असल्यामुळे या दरोड्याचा तपास निश्‍चीत लागेल असा विश्‍वास पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

तिन्ही बाजूने समुद्रखाडीने नैसर्गिक विळखा घातलेल्या दिवेआगरमध्ये १७ नोव्हेंबर १९९७ ला द्रौपदी पाटील यांच्या सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. त्यात ही सव्वा फूट उंचीची सोन्याची गणपतीची मूर्ती आणि सोन्याचे दागिने सापडले होते.

Sunday, 18 March 2012

नोकरी करु न दिल्याने सुनेने केली सासूची हत्या


पुणे: कोथरुड परिसरातल्या मयूर कॉलनीमध्ये एका वृद्धेची निर्घृण हत्या झाल्याचं उघडकीस आलं आणि पुण्यात खळबळ उडाली. आता या हत्येप्रकरणी तेवढाच खळबळजनक खुलासा समोर आला आहे. या वृद्धेच्या सुनेनंच अतिशय नियोजनबद्धरित्या सासूची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
शोभा सेलारका या ६२ वर्षीय महिला मयूर कॉलनीमध्ये राहत होत्या. श्वेता या त्यांच्या सुनेनं सोमवारी संध्याकाळी त्यांची हत्या केली आणि ही हत्या अज्ञात व्यक्तीनं केल्याचा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात श्वेताचं हे कारस्थान उघड झालं.
विमा एजंट म्हणून काम करणाऱ्या श्वेताला नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र सासू शोभा सेलारका यांना ही गोष्ट मान्य नव्हती. यावरुन त्यांचे नेहमी खटके उडायचे. त्याचाच राग मनात धरुन श्वेतानं ही हत्या केली.
मेकअप करण्याच्या बहाण्यानं सासूला आधी खुर्चीत बसवलं आणि घरातल्या खलबत्यानं तिच्या डोक्यावर वार केलं. हा दरोड्याचा प्रकार वाटावा म्हणून घरातल्या सुरीनं सासूच्या गळ्यावर आणि छातीवर वारही केले. त्यानंतर श्वेतानं अंघोळ करुन मुलीला घरी आणलं आणि नवऱ्याला फोन करुन अज्ञात व्यक्तीनं सासूची हत्या केल्याचं सांगितलं.
हत्या केल्यानंतर घरातली कपाटं आणि इतर ठिकाणचं साहित्य अस्ताव्यस्त होतं. मात्र दागिने आणि पैसे घरातच असल्यानं पोलीसही बुचकळ्यात पडले होते.
पोलिसांनी थोडी कसून चौकशी केल्यानंतर श्वेताचा हा बनाव अखेरीस समोर आला.

मुंबईकरांच्या खिशाला कात्री,टॅक्सीच्या भाड्यात वाढ


मुंबई: केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे बजेटनंतर मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईत टॅक्सीचीही भाडेवाढ होणार आहे.
एमएमआरटीएच्या निर्णयानुसार टॅक्सीचं भाडं एक रुपयाने वाढून सतरा रुपये होणार आहे. तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी भाड्यात ५० पैशांची वाढ होणार आहे.
नवी मुंबईतील रहिवाशांसाठी मात्र दिलासा देणारी बातमी आहे. नवी मुंबईत रिक्षाचं भाडं कमी करण्यात आलं आहे.
रिक्षा भाडं १५ रुपयांवरुन ११ रुपये करण्यात आल्याने नवी मुंबईकरांना तेवढंच हायसं वाटलं आहे.

Saturday, 10 March 2012

नवृत्ती..पण चटका लावणारी

बंगळूर। दि. ९ वृत्तसंस्था
कारकीर्दीतीाल शेवटीची कसोटी खेळून द्रविड परत पॅव्हेलियनमध्ये चालला आहे. संघातील सहकारी बॅट वर करून त्याला सलामी देत आहेत. अख्खे स्टेडियम टाळयांच्या गजरात त्याला मानवंदना देत आहेत.. पण द्रविडच्या वाटयाला असा दिमाखदार सोहळा आलाच नाही.
कारकीर्दीतची सुमारे १५ वर्ष मैदानावर रक्ताचे पाणी केल्यानंतरही द्रविडला मैदानाबाहेर बंद हॉलमध्ये निवृत्तीची घोषणा करावी लागते, यासारखे दुर्देव त्याचे नाही.
द्रविडच्या आजच्या निवृत्तीने गांगुलीने नवृत्ती घेतली ते दिवस नक्कीच सगळयांना आठवले असतील. २00८ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेनंतर गांगुलीने संन्यास घेतला होता. चौथ्या कसोटीत धोनीने गांगुलीकडे काही काळासाठी नेतृत्वही दिले होते. खेळ संपल्यानंतर गांगुलीला टीम इंडियाने खांद्यावर घेत मैदानावर फिरवले.
टीम इंडियाची भिंत. असलेल्या द्रविडच्या नशिबी मात्र हे अविस्मरणीय क्षण नव्हते.. ही भिंत अनेक वेळ भारताची इभ्रत राखण्यासाठी खंबीरपणे एकाकी उभी राहिली. आणि शेवटही तशीच उभी राहिली.. एकाकी.

Tuesday, 28 February 2012

सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडावे - अक्रम

नवी दिल्ली - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन कसोटी क्रिकेटकडे लक्ष देण्याचा, सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रम याने दिला आहे.

अक्रम म्हणाला, ''सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडावे, त्यामुळे निवड समितीलाही विचार करायला वेळ मिळेल. निवड समितीच्या सदस्य त्याला वगळण्यास घाबरतात. सचिनने एकदिवसीय क्रिकेट सोडून कसोटी क्रिकेटकडे लक्ष द्यावे. सचिनची सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये खराब कामगिरी होत असली तरी, त्याला वगळण्याचे धाडस कोणी करीत नाही. सचिनने शतकांच्या शतकाबाबत विचार करणे सोडून दिले पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळत राहिले, तर शतकेही होतील.''

Friday, 24 February 2012

भारतीय दांपत्याला 15 लाख डॉलरचा दंड

न्यूयॉर्क - घरकाम करणाऱ्या महिलेला गुलामासारखी वागणूक देणे आणि तिचा छळ करण्याच्या आरोपावरून अमेरिकेतील भारतीय अधिकाऱ्याला स्थानिक न्यायालयाने 15 लाख डॉलरचा दंड ठोठावला. मानसिक छळ करण्यासाठी पाच लाख डॉलरचा दंड करण्यात आला. नीना आणि जोगेश मल्होत्रा असे त्या दांपत्याचे नाव आहे. त्यांच्या घरी काम करणाऱ्या शांती गुरुंग या तरुणीचा व्हिसा आणि पासपोर्ट जप्त करून, पगारही न देता तिचा छळ केल्याचा आरोप या दांपत्यावर आहे.

नीना मल्होत्रा पूर्वी न्यूयॉर्कमधील भारतीय उच्चायुक्तालयात माध्यम संयोजनाचे काम करत होत्या. सध्या त्या परराष्ट्र मंत्रालयासाठी भारतात काम करतात. मल्होत्रा दांपत्याने न्यूयॉर्कमध्ये असताना दैनंदिन घरकामासाठी गुरुंग या तरुणीला 2006 मध्ये अमेरिकेला आणले व 108 डॉलरचा पगार देऊ, असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र गुरुंगला गुलामासारखे काम करावे लागले, असे मॅनहॅटनमधील दंडाधिकारी न्यायालयाने म्हटले आहे. गुरुंगला दिवसाचे सोळा तास काम करावे लागले, शिवाय नीना यांना रोज मसाज करण्यासारखे कामही तिच्याकडून करवून घेतले गेले. तीन वर्षांत गुरुंगचे वजन साठ पौंडांनी खाली आले, असे न्यायालयाने म्हटले.