More Sensational News

Friday, 17 February 2012

मुंबईकरांची मतदानाकडे पाठ



मतदानाचा जोर कमी
मतदानाचा जोर कमी
मुंबई : राज्यातील दहा महापालिकांच्या निवडणुकीसाठीचं मतदान शेवटच्या टप्प्यात आलं आहे. अमरावती, अकोला, नाशिकमध्ये मतदारांनी मतदानाला भरघोस प्रतिसाद दिला. तुलनेने पुणे, ठाणे आणि मुंबईमध्ये मात्र मतदानाचा फारसा जोर दिसून आला नाही.
साडेतीन वाजेपर्यंत मुंबईत केवळ २९ टक्केच मतदान झालं.  ठाण्यात साडेतीन वाजेपर्यंत ४५.४५ टक्के  मतदान झालं.
साडेतीन वाजेपर्यंत अमरावतीमध्ये ४२ टक्के, नाशिकमध्ये ४३ टक्के, अकोल्यामध्ये ४८ टक्के मतदान झालं. सोलापूरमध्ये साडेतीनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी होती ४६ टक्के.
पुण्यात साडेतीनपर्यंत ३७ टक्के तर पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ टक्के मतदानाची नोंद झाली.