More Sensational News

Saturday, 4 February 2012

ब्रेट ली एकदिवसीय मालिकेतून बाहे

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली पायाच्या दुखापतीमुळे सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

या दुखापतीमुळे ब्रेट ली भारत आणि श्रीलंकेबरोबर होत असलेल्या तिरंगी एकदिवसीय मालिकेतून आणि आगामी वेस्टइंडीज दौऱ्यालाही मुकणार आहे. भारताविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ब्रेट लीच्या उजव्या पायाचे हाड तुटले होते. त्यामुळे त्याला सहा आठवडे क्रिकेट खेळण्यापासून दूर रहावे लागणार असल्याचे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डॉक्टर ट्रिफोर जेम्स यांनी सांगितले. ब्रेट लीचे हाड तुटल्याचे एक्स रे केल्यानंतर स्पष्ट झाले.

आज (रविवार) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना होत असून, ब्रेट लीच्या जागी संघात कोणाची निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या जलद गोलंदाजीची धुका मिचेल स्टार्क, रायन हॅरिस, क्लिंट मॅके यांच्यावर असणार आहे.