More Sensational News

Thursday, 2 February 2012

सिब्बल म्हणतात चिदंबरम निर्दोष

नवी दिल्ली, दि. २ - टू-जी स्पेक्ट्रम घोटाळाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये केंद्र सरकारला दोषी धरलेले असताना दूरसंचार मंत्री यांनी आधीच्या म्हणजे भारतीय जनताप्रणीत एनडीए सरकारला जबाबदार धरले आहे. आमच्या सरकारने आधीच्या सरकारने आखलेली धोरणे पुढे सुरू ठेवल्याचा पवित्रा सिब्बल यांनी घेतला आहे. तसेच तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये काहीही संबंध नव्हता असेही स्पष्ट केले आहे. ए. राजा दूरसंचार मंत्री असताना टू-जी स्पेक्ट्रमचे घटनाबाह्य पद्धतीने वाटप झाले होते आणि सरकारला हजारो कोटी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागला होता.
सर्वोच्च न्यायालयाने स्पेक्ट्रम वाटपासंबधी आदेश दिले असून आता दूरसंचार नियामक मंडळाच्या निर्देशांनुसार कार्यवाही करण्यात येईल असेही सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.