More Sensational News

Tuesday, 24 January 2012

अग्निपथ'च्या गाण्यावर न्यायालयाची बंदी

नागपूर - कॉपीराइट कायद्याचा उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका असलेला "अग्निपथ' या हिंदी चित्रपटातील एका गाण्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने बंदी घातली आहे. संबंधित गाणे वगळून चित्रपट प्रदर्शनाला न्यायालयाने परवानगी दिली आहे.

"अग्निपथ' चित्रपटातील "तेरी मेरी कहानी अधुरी...' या गाण्यात कॉपीराइट कायद्याचा उल्लंघन केल्याचा आरोप करून आदित्य सालनकर याने जिल्हा सत्र न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायाधीश पी. व्ही. गनेडीवाला यांनी चित्रपटातील गाण्यावर बंदी घातली आहे. आदित्यने लिहिलेल्या गाण्याच्या पहिल्या दोन ओळी आणि चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे साम्य असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. त्यामुळे हे गाणे वगळून चित्रपट प्रदर्शित करण्याचा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.

26 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.