More Sensational News

Tuesday, 17 January 2012

बॅनर्जी सरकार हुकूमशहा- कॉंग्रेस

कोलकता - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे सरकार हुकूमशहा असल्याचा आरोप कॉंग्रेसच्या नेत्यांनी केला असून बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बॅनर्जी यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकल्याने अपमानित झालेले कॉंग्रेस नेते मनोज चक्रवर्ती म्हणाले, की प. बंगालची जनता मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाबाबत प्रश्‍न उपस्थित करत आहेत. मी हे प्रकरण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना सांगितले आहे. त्यांच्या उत्तराची मी वाट बघत असून त्यानंतरच मी मंत्रीपदाचा राजीनामा देईन.