More Sensational News

Tuesday, 27 December 2011

भारताचा पहिला डाव २८२ धावांवर आटोपला

मेलबर्न - भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव २८२ धावांत आटोपला असून, ऑस्ट्रेलियाला ५१ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेन हिल्फेनहॉसने पाच तर पीटर सीडलने तीन गडी बाद केले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात योग्य दिशेने सुरवात करणाऱ्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला तोडीस तोड उत्तर दिले. यजमानांना ३३३ धावांत गुंडाळल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद २१४ अशी मजल मारताना भारताने पहिल्या डावात आघाडी घेण्याकडे भक्कम पाऊल टाकले. सेहवागचे आक्रमक अर्धशतक आणि त्यानंतर सचिन-द्रविड यांची शतकी भागीदारी ऑस्ट्रेलियाला सावधानतेचाच इशारा देणारी होती. सचिन ७३ धावांवर बाद झाला होता.

भारताकडून सचिनने ७३ तर राहुल द्रवीडने ६८ व वीरेंद्र सेहवागने ६७  धावा केल्या आहेत.      

Source : http://esakal.com/eSakal/20111228/5578529553581609367.htm